नगर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मांगी तलावाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ
मांगी प्रतिनिधी
राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस असताना करमाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते ,यामुळे तालुक्यातील बरेचसे लघु प्रकल्प कोरडे पडले होते ,पावसाचा जोर कमी असल्याने मागील दोन-तीन महिन्यापूर्वी अत्यल्प पाणीसाठा असणाऱ्या मांगी तलावात काल दिनांक 12 सप्टेंबर च्या रात्री नगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे ,रात्रीच्या पावसामुळे चार ते पाच फुट एवढी पाणी पातळीत वाढ झालेली आहे, यामुळे मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह मांगी तलावाच्या खालील बारा गावच्या बोरगाव पाणीपुरवठा योजनेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, यामुळे लाभ क्षेत्रातील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ,अवघ्या रात्रीतून पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे ,तलावातील शेती पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली, मांगी तलावातील पाण्याचा उपयोग नियोजनबद्ध करावा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तलावातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी टंचाईचा होणार नाही, त्याचप्रमाणे मांगी तलावावरती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांची सफाई करण्यात यावी अशी मागणी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार अवचर यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेले आहे,
