मा.आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियानाला सुरुवात
करमाळा प्रतिनिधी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे उद्घघाटन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.गत सात वर्षांपासून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वैभवराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.यंदा देखील या अभियानाला एसटी बस स्थानकासमोरुन सुरुवात करण्यात आली आहे.टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व प्रभागात हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली.या अभियानाला शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी नगरसेवक ॲड.नवनाथ राखुंडे,अमोल जाधव यांच्यासह जगताप प्रेमी नागरिक आणि नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.
