Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील गटातटाच्या, जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून द्या-दशरथ आण्णा कांबळे

करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणाला जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन, करमाळा तालुक्यामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून द्यावे, असे मत “शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे” यांनी व्यक्त केले. जिंती, तालुका करमाळा येथे प्रा. रामदास झोळ सर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. रामदास झोळ सर यांचे वडील मधुकर झोळ, अनुरथ झोळ, पांडुरंग झोळ प्रा रामदास झोळ सर, सौ. मायाताई झोळ मॅडम, दादा बापू साखरे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे,श्रीकांत साखरे पाटील,काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, तुकाराम खाटमोडे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, कल्याण दुरंदे,चंद्रशेखर जगताप, रवींद्र धेंडे सर, संभाजी शिंदे, राजेंद्र बाबर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर प्रस्थापित नेते मंडळी मते मागत आहेत. सत्ता आपणाकडेच होती तरी रस्ते, पाणी, वीज यासारखे मूलभूत प्रश्नही आपणास सोडवत आले नाही. नुसताच विकासाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल केल्यामुळे करमाळा तालुका ‌ विकासापासून वंचित राहिला. आपल्या बापाचा नावाचा गट सांभाळा आपल्या बापाचे नाव घ्या. सभेत टिका कामाकाजावर करा. तुझ्या आई बापाने काय केले? हे सांगण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आदिनाथ आता हातातून गेला. मकाईची अवस्था तिचं आहे. मकाईचे ३५ कोटींची बिल मिळवून दिली. याच बरोबर कमलाई, भैरवनाथ, विठ्ठल शुगर्सचे पैसे मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. २०२६ पर्यंत मोठे शैक्षणिक संकुल देवळाली येथे उभा करणार आहेत. येथे सर्व हाणाहानी चालू आहे. कर्जतमध्ये शिक्षणाची सोय आहे. करमाळा तालुक्यामध्ये नाही. असे संस्थाचालक आहेत जे नोकरी देण्यासाठी पैसा घेत नाही. सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेणे आता आवक्याबाहेर आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारा आर्थिक पाठबळ देऊन न्याय मिळवून देण्याचे काम प्रा.रामदास झोळ सर यांनी केले आहे.सर्व चित्र बदलण्याची ताकत तुमच्यात आहे. मताचा अधिकार आपणास आहे. चांगल्या लोकांना मतदान द्या. आमदार निवडून द्यायचा हा विचार नक्की करावा. तुमचे दुःख, दैन्य, वैशीला टांगणार आहे. सर्व सुख समृद्धी त्यांच्या पायाशी आहेत. तरी सुध्दा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून २०० मुलांना रोजगार मिळणार आहे. चार उमेदवारांची तुलना करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू, विकासाची दृष्टी असलेले, शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या प्रा. रामदास झोळ सर यांना *रिक्षा* या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे. ते करमाळा तालुक्याचा नक्कीच सर्वांगीण विकास करतील. त्यामुळे एक वेळ एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भूमिपुत्र असणाऱ्या प्रा. रामदास झोळ सर यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. जिंती येथील सभेमध्ये भागवत भराटे यांनी त्यांच्या सहकार्यासह झोळ परिवारामध्ये प्रवेश केला.
यावेळी प्रा. रामदास झोळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, रस्ते, पाणी, ‌वीज याबरोबरच ‌ शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी ‌आपण पायाभूत काम करणार असून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यामध्ये आपण ‌ शेतकरी, कष्टकरी, वंचित यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले असून आंदोलन, मोर्चे यांच्या माध्यमातून ‌ शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. तरी ‌करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकाससाठी ‌मला निवडून देऊन एक वेळ करमाळा तालुकावासियांची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले. जिंती येथे झालेल्या सभेसाठी शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group