Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाकृषी

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत महावितरण कंपनीने बघू नये कृषी पंपाची लाईट पुरवत करावी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत महावितरण कंपनीने बघू नये कृषी पंपाची लाईट पुरवत करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीस न देता डीपी सोडवण्यात आले आठ ते दहा दिवस झाले शेतकऱ्यांची कृषी पंपाची लाईट बंद केल्यामुळे हातात तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या महावितरण च्या अधिकाऱ्यांमुळे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांना अकराव्या महिना मध्ये ऊस गाळप साठी गेलेल्या उसाचा अजून बिलाचा पत्ता नाही शेतामध्ये कांदा गहू हरभरा मका जवारी अशी पिके उभी आहेत सध्या शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे शेतकरी हात बलझाला आहे शेतामध्ये पिके जोरात आलेले आहे परंतु शेतकरी कोमांमध्ये गेला आहे महावितरण कंपनीने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये दोन दिवसांमध्ये कृषी पंपाची लाईट पुरवत करावी जर लाईट जोडली नाही तर बळीराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक प्राचार्य नागेशरावजी माने बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव येडे तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर अनिल तेली नंदकुमार टांगडे, वैजनाथ तरंगे बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष कल्याण कोकरे तालुका उपाध्यक्ष नवनाथ कोळेकर तालुका उपाध्यक्ष हनुमंत राऊत निलेश पडवळे समाधान मारकड आधीचं पदाधिकारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group