करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची मान्यता
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरच मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पांडुरंग उबाळे यांच्यासह संबधीत अधिकारी उपस्थित होते. भवानी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्याची मागणी करमाळ्यातील शिवस्मारक प्रतिष्ठानने दोन वर्षे पूर्वी केली होती. परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर पुतळा उभारण्यास मान्यता दिली आहे यावेळी नगरसेवक प्रवीण जाधव, अतुल फंड, सचिन घोलप, सुनील सावंत, संजय घोलप, अमोल यादव आदी उपस्थित होते.
