करमाळाताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

शेतकरी कामगार कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही कार्यरत असून यांच्या समस्या तात्काळ न सोडवल्यास जन आंदोलन करणार- प्रा. रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी शेतकरी कामगार कष्टकरी लोकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही कार्यरत असून यांच्या समस्या तात्काळ न सोडवल्यास प्रा. रामदास झोळ फाउंडेशन माध्यमातून सर्व पक्षीय लोकांना बरोबर घेऊन जनआंदोलन करणार असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील विद्यार्थी शेतकरी कष्टकरी यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात याबाबतचे निवेदन प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या उपस्थितीमध्ये प्रा. रामदास झोळ यांनी करमाळ्याचे तहसीलदार यांना दिले आहे .याबात निवेदन नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी स्वीकारले असुन सदर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मागील दीड महिन्यापासून करमाळ्यात पाऊस न पडल्याने शेतकरी व कष्टकरी प्रचंड अडचणीत आलेले आहेत त्यामुळे करमाळा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावा करमाळा तालुक्यात मध्ये तहसीलदार व प्रांत पूर्ण वेळ उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होत आहे. करमाळा तालुक्यातील मकाई कारखाना भैरवनाथ शुगर विहाळ कमलाई शुगर या तिन्ही कारखान्याने 2022 23 हंगामातील उसाची बिले पंधरा टक्के व्याजासह पूर्ण केलेले नाहीत तरी आठ दिवसात ती बिले देण्यात यावी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी तसेच त्यांच्या नावावरती त्यांच्या काढलेली रुक्मिणी बँकेचे व इतर वित्तीय संस्थेची कर्जे भरून कारखान्यांनी कर्मचाऱ्यांना कर्ज निरंक करून कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यात यावे आदिनाथ साखर कारखान्याचे ऊस वाहन मालकाची थकलेली ऊस बिले तात्काळ देण्यात यावीत वाहन मालकावर नावावरती उचललेले कर्ज त्वरित भरून निरंजचे दाखले त्यांना देण्यात यावेत सध्या विविध सणांचा कालावधी असल्याने शेतकरी कष्टकरी कामगारांना पैशाची कमतरता भासत आहे म्हणून सर्व थकलेली बिले कारखान्याने आठ दिवसात न दिल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रा. रामदास झोळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी दिला आहे या निवेदनावर प्राध्यापक रामदास झोळ सर आदिनाथचे माजी संचालक कामगार नेते दशरथ अण्णा कांबळे रासपचे अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते धनगर समाज संघटनेचे बाळासाहेब टकले संतोष वाळुंजकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष गफुर शेख माजी सरपंच भगवान डोंबाळे मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे प्रभाकर शिंदे शिवसेना नेते संजय शिंदे, नानासाहेब देवकर बाबाजान खान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके ,युवा तालुका अध्यक्ष अमोल घुमरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन काळे भाजपाचे सुहास ओहोळ वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार बीजेपी किसान मोर्चाचे विजयकुमार नागवडे अशोक जाधव युवराज जाधव यांच्या निवेदनावर सह्या असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन मागण्याची पूर्तता न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा ‍प्रा. रामदास झोळ फाउंडेशन शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यावतीने देण्यात आला आहे .शेतकरी कामगार कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढा चालूच राहणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले‌.

error: Don\'t try to copy. Content is protected !!