अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी *पद्मश्री,सेवाव्रती,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय खडतर अशा संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ मुलांवर मायेचे छत्र धरले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.**अशा थोर माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ९ जानेवारी रोजी सकाळी यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथ साडे नऊ वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे, करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक, सर्व समाजसेवक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.*
