चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा मातंग एकता आंदोलन करमाळा शहराच्या वतीने जाहिर निषेध
करमाळा प्रतिनिधी
दि.९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील कार्यक्रमात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, यांनी शाळा सुरु केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकार ने अनुदान दिल नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रु देणारे लोक होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत. असे वक्तव्य करुन महापुरुषांचा अवमान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याचा मातंग एकता आंदोलन करमाळा संघटेनेच्या वतीने जाहिर निषेध करून तहसिलदार साहेब व पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांना पत्र देऊन निषेध व्यक्त केला यावेळी मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष शरद भैय्या पवार शहराध्यक्ष युवराज भाऊ जगताप,अभिजीत मंडलिक, पप्पू मंडलिक पत्र देऊन सोमवारी होणाऱ्या . कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीराव फूले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केल्याने भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजता मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत येथील रिपाई, मातंग एकता आंदोलन, निषेध मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.