अन ..हाके अण्णाच्या आठवणीने रश्मी दीदीला अश्रू अनावर झाले भावपुर्ण श्रध्दांजली वाहुन केले हाके कुटुंबाचे सांत्वन
प्रतिनिधी बागल गटाचे कट्टर समर्थक मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ हाके त्यांचे वडील कारभारी हाके यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यांच्या निधना मुळे हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बागल गटाचे नेत्या रश्मी दीदी बागल यांनी हाके कुटुंबाची सांत्वन पर रामभाऊ हाके यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून फुले वाहिली हाके कुटुंबियाचे सात्वंन केले याप्रसंगी रश्मी दीदींना अश्रू अनावर झाले आण्णाच्या आठवणीने आसंमत जागा झाला जुन्या आठवणी जाग्या झाल्याने ऊर भरुन आला आपणास छत्र छाया देणारे वटवृक्ष आपली माणसं आपल्यातून गेल्यानंतर त्याची पोकळी भरून येऊ शकत नाही त्यांच्या आठवणीचे स्मरण ठेवून जीवन त्यांच्या आदर्श घालून दिलेल्या तत्त्वाने जीवन जगणे हीच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली ठरत आहे
