करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश*

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत *दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ चा* विद्यार्थी *कुमार पवन सुभाष सामंत* इयत्ता आठवी या विद्यार्थ्याने ६१.७४ टक्के प्राप्त करून इंग्रजी माध्यमातून राज्याच्या गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवले आहे. करमाळा तालुक्यातून इंग्रजी माध्यमातून यश मिळवणारा एकमेव विद्यार्थी  आहे.या यशासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री.राणादादा सुर्यवंशी साहेब, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट सौ.नंदा ताटे मॅडम, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. डॉ.विशाल बाबर सर स्कूलचे प्राचार्य श्री.विजय मारकड सर, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group