Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासाखरउद्योग

आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला सहकार्य करावे बंद पाडण्यासाठी अडकाठी घालु नये महेश चिवटे यांचा सुभाष गुळवेना सवाल 

 

करमाळा (प्रतिनिधी ) आदिनाथ कारखाना बंद पडला तरच खाजगी कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊस मिळेल व या माध्यमातून आपले राजकीय महत्त्व वाढेल व येणाऱ्या काळात आपण विधानसभेचे दावेदार होऊ या भावनेतून गेल्या तीन वर्षापासून आदिनाथ कारखान्याचे माझी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आमदार रोहित पवार यांना चुकीच्या माहिती देऊन आदिनाथ साखर कारखाना बंद पाडण्याचे काम केले असून आता तरी त्यांनी सभासदांचे व तालुक्याचे हित लक्षात घेता आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी व पायात पाय घालून कारखाना बंद पाडण्याचे काम  गुळवे यांनी थांबवावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा आदिनाथ बचाव समितीचे निमंत्रक महेश चिवटे यांनी केले आहे

तीन वर्षांपूर्वी आदिनाथ कारखाना आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती ॲग्रोवन भाडे कराराने घेतल्यानंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते सर्व गटातटाच्या सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी व शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवारांचे स्वागत केले
आमदार पवार आदिनाथ सुरू करून करमाळा तालुक्यातील जनतेला न्याय देतील अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली होती मात्र घडले उलटे जाणीवपूर्वक कायदेशीर अडथळे उभा करून बारामती ॲग्रो ने आदिनाथ कारखाना सुरू केला नाही .गेल्या वर्षी बारामती ॲग्रो कारखान्याचे विस्तारीकरण झाले होते त्यांना गाळपसाठी अतिरिक्त सात ते आठ लाख टन उसाचे आवश्यकता होती आदिनाथ कारखाना बंद पडला तरच आपल्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस मिळेल या भावनेतून सुभाष गुळवे यांनी गतवर्षी सुद्धा आदिनाथ कारखाना बंद ठेवावा लागेल अशी चुकीची माहिती आमदार रोहित पवारांना दिलीआता नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेऊन राज्य सहकारी बँकेची स्वतः थकबाकी भरून आदिनाथ करमाळा तालुक्यातील जनतेला मदतीचा हात दिला आहे याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिनाथ कारखान्याच्या कर्ज पुनर्गठन ला मान्यता देऊन आदिनाथ कारखाना सहकार तत्वावर चालू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे असे असताना आदिनाथ कारखान्याला एक रकमी परतफेड योजनेचा फायदा देऊ नका असे सांगत सुभाष गुळवे न्यायालयात गेले आहेत .म्हणजे आदिनाथ कारखान्याला मिळणारी शासकीय मदत सुद्धा थांबविण्याचा प्रयत्न सुभाष गुळवे न्यायालयाच्या माध्यमातून करत आहेत हा सुभाष गुळवे यांचा प्रयत्न म्हणजे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातील प्रचंड मताधिक्य दिले होते पवार कुटुंबावर करमाळा तालुक्यातील जनता जीवापाड प्रेम करते याची दखल घेऊन आता आमदार रोहित पवार यांनी आदिनाथ सुरू करण्यासाठी आदिनाथ कारखान्याला ज्याप्रमाणे प्राध्यापक नामदार तानाजीराव सावंत यांनी मदत केली त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी सुद्धा आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आदिनाथ च्या कारखान्यात दहा कोटी रुपयांची डिपॉझिट करून कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावीकारखाना बळकवण्यापेक्षा कारखान्याच्या कारभारात लक्ष घालून वेळप्रसंगी कारखान्याला आर्थिक मदत करून आदिनाथ कारखान्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील जनता त्यांना नक्की साथ देईलअसे मत ही शेवटी महेश चिवटे यांनी व्यक्त केले

#####
नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणताही स्वार्थ न दाखवता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची भवितव्य उज्वल होण्यासाठी स्वतः पाच कोटी रुपये कारखान्याच्या खात्यात भरून कारखान्याला म्हणजेच करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला या प्राध्यापक तानाजी सावंत यांचे भूमिकेचे करमाळा तालुक्यातून स्वागत होत आहे
#####

आमदार रोहित दादांबद्दल आदर पण!!!

आमदार रोहित दादा पवारांबद्दल करमाळा तालुक्यातील जनतेला तर आदर आहेच पण प्रत्येक ऊस उत्पादकांना आदर आहे पण त्यांच्या नावाने करमाळ्यात राजकारण करणारे व सर्वसामान्यांना पिळवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून जो जनतेला त्रास होतो त्याचे दखल घेण्यासाठी आमदार रोहित पवारांनी तालुक्यातील जनतेचा कानोसा घ्यावा मग त्यांच्या परिस्थिती लक्षात येईल तालुक्यातील सर्व आजी माजी आमदार सुद्धा खाजगीत काय बोलतात याबाबत चर्चा कुजबूज करमाळा परिसरात सुरू आहे याची माहिती ही आमदार रोहित पवारांनी घेणे गरजेचे आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group