Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

आळसुंदे येथील 40 आंदोलकावर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार श्री औदुंबरराजे भोसले संध्या यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी नेरले तलाव उजनीच्या पाण्याने दहिगाव योजने द्वारे भरण्यासाठी आळसुंदे येथील रस्ता रोको आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल नागरिकातून संतापाची लाट अशी माहिती नेरले ग्रा.पं.माजीसरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे.दहिगाव उपसा सिंचन योजनेतून उजनी धरणाचे वाहून जाणारे पाणी नेरले तलावात सोडण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील पाणी मिळत नसल्यामुळे दि-16/08/ 2024 रोजी पोलीस स्टेशन करमाळा,तहसील कार्यालय, दहिगाव योजना कार्यालय,यांना नेरले,आळसुंदे ग्रा.पं.ठरावासह दिनांक 23/08/ 2024 पर्यंत पाणी न सोडल्यास रस्ता रोको करण्याचे निवेदन दिले होते.त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले व आंदोलन स्थळी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कर्मचारी कांबळे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे 30 ते पस्तीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते कांबळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांच्या हस्ते व तालुक्यातील 200 ते 225 नागरिक सर्व पत्रकार परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच ,सदस्य, चेअरमन अशा जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सव्वा दहा वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे अकरा वाजता स्थगित करण्यात आले,आंदोलन शांततेत पार पडले व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नागरिकांसोबत चर्चा करून चहा घेऊन आंदोलन शांततेत झाले बद्दल सर्वांचे आभार मानून आंदोलन ठिकाणाहून करमाळा कडे गेले पाच वाजता घुगे यांनी पोलीस कॉन्स्टेबल दळवी यांना सांगून आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले.नेरले आळसुंदे परिसरातील नागरिक म्हणतात 200 ते सव्वा 200 लोक आंदोलन करण्यासाठी होते,मग फक्त 40 लोकांवर गुन्हे दाखल का झाले, संपूर्ण नावे पोलिसांना माहिती झाली कशी काय, सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद वाक्य पोलीस खात्याला आहे.ज्या पोलीस स्टेशनने आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला पोहोच दिली पोलीस एफ आय आर मध्ये म्हणतात,आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यामुळे आम्ही आळसुंदे फाट्याकडे गेलो असता सदर 40 लोक तिथे बसून आंदोलन करत होते.अशी खोटी फिर्याद दिली आहे हे पोलीस निरीक्षक व पोलीस खात्याला न शोभणारी गोष्ट आहे.पावणे अकरा वाजता आंदोलन संपलेले पाच वाजता कोणाच्या सांगण्यावर तरी गुन्हे दाखल झाले हे सर्व परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले आहे.सर्व पार्टी पक्ष गटाचे लोक आंदोलनात सहभागी होतेमग एका गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत.मांजर डोळे मिटून दूध पीत असते परंतु इतर लोकांचे डोळे उघडे असतात, त्याचे भान गुन्हे दाखल करायला लावणाऱ्या नेत्यांनी ठेवायला हवे गुन्हे दाखल करायला लावले खरे परंतु पोलीस प्रशासनाने असे खोटे काम योग्य नाही.आम्ही लोकशाही मार्गाने पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहोत.आम्हाला पिण्याचे पाणी न देता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करूनही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु हे आंदोलन दडपत नसून अधिक तीव्र होणार आहे.हे गुन्हे मागे न घेतल्यास गुन्हे मागे घेण्यासाठी तीव्र आंदोलन करणार , व याचे गंभीर परिणाम निवडणुकीमध्ये भोगावे लागतील असा इशारा नागरिकांच्या वतीने नेरले ग्रा.पं.माजीसरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुप चे संस्थापक श्री.औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group