प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास जीवनात यश नक्की..वनक्षेत्रपाल जाधव
करमाळा प्रतिनिधी
” प्रत्येकानी आपापल्या कर्तव्याच्या ठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास ते जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतात “,असे प्रतिपादन करमाळा वनपरिक्षेत्र माळढोक विभागाचे वनक्षेत्रपाल उत्तमराव जाधव यांनी केले.माळढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र विभागाचे वनसेवक मजनु शेख यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त पिंपळवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपाल गोपाळ दौंड हे होते. यावेळी वनरक्षक गणेश झिरपे, प्रदीप शिंदे, युवा नेते शंभुराजे जगताप, सरपंच मदन पाटील, पत्रकार अलीम शेख, कय्युम शेख, पप्पू वीर ,भाऊसाहेब थोरात, राहुल कांबळे, सुनील कांबळे ,बाळासाहेब बर्डे,सामाजिक कार्यकर्ते कय्युम शेख, हुसेन तांबोळी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना वनक्षेत्रपाल जाधव म्हणाले की मजनू शेख यांनी त्यांच्या 36 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांनी वन, पक्षीमित्र व सर्पमित्राच्या बरोबर कामे केलेली आहेत. श्री शेख यांनी वन्य जीवाचे रक्षण करणे कामी मोठे योगदान दिले आहे. यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. मजनू शेख यांनी यावेळी सांगितले की त्यांनी कात्रज येथे सर्प मित्राचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच वन्य जीवाचे रक्षण कसे करावे याबाबतचे ही प्रशिक्षण त्यांनी घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यांनी विहिरीत पडलेल्या कोल्हे, लांडगे मोर आदींना विहिरीतून काढून तसेच शहरात गावामध्ये पकडण्यात आलेल्या सर्पाना वनविभागात सोडून जीवदान दिलेले आहे. यावेळी सर्वांचे आभार सजन शेख, शाहरुख शेख यांनी मानले. यावेळी सर्वांचे स्वागत शाहरुख शेख, जावेद शेख, राजू शेख यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी वनसेवक लाला गाडे, प्रभाकर गाडे, रज्जाक शेख, दादा सय्यद ,हुसेन तांबोळी आदि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महबूब शेख, रहमान शेख, पापा शेख ,असलम शेख, साहिल शेख, जाहंगीर सय्यद आदींनी परिश्रम घेतले. सर्वांचे आभार राजू शेख, कय्युम शेख यांनी मानले.
