‘सरपंच परिषदेमुळे पथदिव्यांचा प्रश्न निकाली -डाॕ.अमोल दुरंदे
करमाळा प्रतिनिधी पथदिव्यांची वीजबिले शासनाकडून भरण्याच्या शासन निर्णयाचे करमाळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष व राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी स्वागत केले आहे. ग्रामपंचायतींची पथदिव्यांची वीज बिले शासनाने भरावीत, ग्रामपंचायतीच्या निधीतून विजबिलांची वसुली केली जाऊ नये यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने पाठपुरावा तसेच कंदिलमोर्चा आंदोलन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील असंतोष वाढल्यानंतर शासनाला जाग आली. त्यामुळे पथदिव्यांचे बिल वीज जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले.
