लखनौ येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धे साठी निलेश सातव याची महाराष्ट्र राज्य संघात निवड
जेऊर प्रतिनिधी ७ ते ११ सप्टेंबर रोजी लखनौ येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धे साठी निलेश सातव याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. त्याला प्रशिक्षक विनोद गरड यांनी मार्गदर्शन केले आहे निलेश सातव हा नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चा खेळाडू आहे त्याचे निवडी नंतर मा आमदार नारायण आबा पाटील अतुल भाऊ पाटील सभापती पृथ्वीराज भैया पाटील, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र चे उपाध्यक्ष रुपेश मोरे ,सचिव राजाराम राऊत सर , सोलापूर जिल्हा व शहर चे सुदेश मालप सर, आनंद चव्हाण सर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
