Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

मकाई कारखान्याची शेतकरी कामगार वाहतुकदार यांची देणी दिल्यास कारखाना बिनविरोध करून मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांचा जाहीर सत्कार करू- प्रा. रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी मकाई कारखान्याची शेतकरी कामगार वाहतुकदार यांची देणी दिल्यास कारखाना बिनविरोध करून मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांचा जाहीर सत्कार करू असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी बचाव समितीच्या करमाळा येथील बैठकीत व्यक्त केले. आदिनाथ मकाई कारखाना शेतकऱी
सभासदाचे सहकाराचे मंदिर असून हे कारखाने चांगल्या पद्धतीने चालून टिकवणे गरजेचे असून सभासदांचे हितासाठी आदिनाथ कारखान्यात आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून भूमिका घेतली होती याच पद्धतीने मकाई कारखाना वाचवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मकाईचे साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदाची कामगारांची ऊस वाहतूक दाराचे देणी आठ दिवसात दिल्यास आम्ही मकाई साखर कारखाना बिनविरोध करून मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांचा बचाव समितीच्या वतीने जाहीर सत्कार करू अशी बचाव समितीची अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. या बैठकीला दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे, शहाजीबापू देशमुख, गोवर्धन चवरे, हनुमंत मांढरे पाटील, राजाभाऊ देशमुख, अंकुश केकाण, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे आण्णा सुपनवर गफुर शेख आदी उपस्थित होते.जर‌ देणी दिली नाही तर‌ आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
या निवडणुकीत चांगल्या लोकांनी उतरावे. मकाईमध्ये बदल घडवण्यासाठी समविचारींनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे म्हणाले, या निवडणुकीत सक्षम संचालक देण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरत आहे. स्व. दिगंबरराव बागल यांनी स्थापन केलेला हा कारखाना त्यांच्या विचाराने चालला पाहिजे. जर शेतकर्यांची सर्व देणी सत्ताधार्यांनी दिली तर कारखाना बिनविरोध करु, असे त्यांनी सांगितले आहे. निवडणुक बिनविरोध करणे हे आता सर्वस्वी बागल यांच्याच हातात आहे. जर सर्व पैसे दिले तर आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असे चिवटे यांनी सांगितले आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत मांढरे. पाटील राजकुमार देशमुख आण्णा सुपनवर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group