आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा जाधव–पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुळव्याध (पाईल्स) उपचारासाठी 26 डिसेंबरला विशेष शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी : आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा आणि जाधव–पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुळव्याध (पाईल्स) उपचारासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात करमाळा व महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुळव्याध तज्ज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे (एम.बी.बी.एस., एम.एस. जनरल सर्जन) रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. मुळव्याधीचे रुग्ण ज्या लक्षणांनी त्रस्त असतात—गुदमार्गात खाज येणे, गुद्दराभोवती सूज येणे, गाठ बाहेर येणे तसेच शौचातून रक्तस्राव होणे—अशा रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.शिबिरामध्ये मुळव्याधीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांसाठी इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी) तसेच लेझर उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपचार पद्धतींमध्ये ऑपरेशनची गरज नसून, रुग्णांना अॅडमिट होण्याचीही आवश्यकता नाही.उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी सकाळी उपाशीपोटी उपस्थित राहावे. इंजेक्शन मुळव्याधीच्या ठिकाणी देण्यात येते तसेच आवश्यकतेनुसार हाताच्या शिरेतून औषध दिले जाते. रुग्णांनी सोबत विल किंवा लुंगी आणावी, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. विशेष आहार पथ्याची आवश्यकता नसल्याचेही सांगण्यात आले आहे.या शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, नोंदणीसाठी मो. 7559214551 या क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्णांनी सकाळी ८ ते १० या वेळेत हॉस्पिटलमध्ये हजर राहावे.शिबिराचे स्थळ जाधव–पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा असे आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रोहन प्रदीप पाटील (एम.बी.बी.एस., एम.डी. फिजिशियन, FCPS Medicine) तसेच डॉ. सौ. शिवानी रोहन पाटील (एम.बी.बी.एस., एम.डी. पॅथॉलॉजी) यांचे सहकार्य लाभत आहे.अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 8329459591, 8975676020, 7507314133 तसेच हॉस्पिटल फोन (02182) 299611.


