डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्यावतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या भिम अनुयायांना मोफत अन्नदान
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या भिम अनुयायांना मोफत अन्नदान केले आहे. करमाळा येथून सुमारे ५० तरुण यासाठी कोरेगाव भीमा येथे गेले होते. अन्नदान करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ते तेथे गेले होते. विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जातो. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला भारताच्या काना कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात. प्रशासनाकडून सुविधा दिल्या जातात मात्र त्यात आपलाही सहभाग असावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. येथे इतरही समाजबांधव मदत करतात. त्यात करमाळा येथील तरुणांनी यावेळी सहभागी होत अन्नदान स्टॊल लावला होता. अनुयायांना अन्नदान करता यावे म्हणून सर्व नियोजन करून सुमारे ५० तरुण येथून गेले होते. यापुढेही असाच उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटनेतील सदस्यांनी सांगितले आहे. या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या करमाळा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही त्यांनी आभार मानले आहेत.