करमाळा भूषण स्व.गिरधरदास देवी यांच्या जयंतीनिम्मित ११ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबीर
करमाळा प्रतिनिधी करमाळा भूषण स्व.गिरधरदास देवी यांच्या जयंतीनिम्मित करमाळा अर्बन बॅंक नागरिक संघटना यांच्यावतीने ११ मार्च रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत अर्बन बॅक सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती अर्बन बॅकेंचे व्हाईस चेअरमन महादेव आण्णा फंड यांनी केले आहे.या रक्तदान शिबीरात रक्तदान करणाऱ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी या रक्तदान शिबीरात जास्तीत नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


