आदिनाथ कारखाना चालु करायचा असेल तर सभासदानी आर्थिक सहकार्य करा अन्यथा कारखाना चालु करायचा का नाही तर तुम्हीच सांगा- हरीदास डांगेसाहेब
करमाळा प्रतिनीधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आधारवड ठरलेल्या तीस हजार सभासद असलेल्या आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठी प्रत्येक सभासदांनी पाचते दहा हजार रुपंयाची आर्थिक मदत केली तर कारखाना चालु होईल अन्यथा कारखाना चालु होणे अशक्य आहे त्यामुळे सर्वानी विचार करुन ठरवा आदिनाथ कारखाना चालु करायचा आता आपल्या हातात पण प्रत्येकांनी फुल ना फुलाची पाकळी सहकार्य करावे असे आवाहन हरीदास डांगेसाहेब यांनी केले आहे.आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठी आदिनाथ कारखान्यावर बोलावलेल्या मिंटीगवेळी बोलताना सांगितले. मी माझ्या अनुभवाचा फायदा आपल्या आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठी होईल या उद्देशाने आपल्या तालुक्यातील मंडळीच्या आग्रहामुळे यामध्ये सहभागी झालो आहे.आता सत्तर टक्के काम झाले आहे तीस टक्के बाकी असुन त्यासाठी पैशांची गरज आहे आपण सहकार्य केले तर कारखाना चालु होईल मी स्वत पाच लाख दिले आहे मी कारखान्यासाठी आणखी पाच लाख देत आहे. या बैठकीला आदिनाथचे जेष्ठ संचालक डाॅ वसंतराव पुंडे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख बापुराव देशमुख लालासाहेब जगतापसर शिवाजीराव बंडगर सर गणेश करे पाटील राजेंद्र बेरे,दत्तात्रय जाधव गोरख आप्पा जगदाळे यांच्या उपस्थितीत बैठक चालु आहे. आदिनाथ कारखान्यासाठी ना. तानाजी सावंतसरांनी ९ कोटी रुपये भरले आहेत चार पाच कोटीसाठी कारखाना दुसऱ्याच्या घश्यात घालु नका असे ते म्हणाले आहेत. मा.आमदार नारायण आबा पाटील बागल गटाचे नेत्या रश्मी दिदी बागल या गटाचे संचालक मंडळ सभासदांचे सहकार्य लाभत आहे. याबाबत बोलताना हरीदास डांगेसाहेब म्हणाले जरी सभासद मिटिंगला उपस्थित नसले तरी बऱ्याच सभासदानी फोन करुन आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठीची रक्कम येत्या आठ दिवसात जमा होईल व आदिनाथ साखर कारखाना नक्की चालु होणार असल्याचे सांगितले.
