सकारात्मक

भारताच्या टेक्स्टाईल कमिटीचे सचिव *अजित चव्हाण यांनी केले चित्रकार खिलारेंचे कौतुक

मुंबई,दि.जर्मनीतील बर्मन शहरात दि.१५ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या ओनिल आर्ट गॅलरीत सोलापूर येथील विख्यात चित्रकार नितीन खिलारे यांची चित्रे सजलेली असतानाच मुंबईत काल भारत सरकारच्या टेक्सटाईल कमिटीचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित चव्हाण यांनी खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्राचे तोंड भरुन कौतुक केले.
ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तकातील ७५ दिग्गज मान्यवरांची व्यक्तिचित्रे नितीन खिलारे यांनी रेखाटली आहेत.त्या चित्रांचे राज्यभरातून कौतुक झाले.टेक्स्टाईल उद्योगाच्या वस्त्र निर्मिती तसेच देशात तयार होणाऱ्या टेक्सटाइल यंत्रसामुग्री निर्मितीच्या दर्जाची निगडित कार्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या टेक्सटाइल कमिटी या स्वायत्त संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे आय.ए.एस.अधिकारी अजित चव्हाण हे आहेत.गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांचे संपादक राजा माने यांच्याशी स्नेहसंबंध आहेत.चव्हाण हे कलाप्रेमी म्हणून ओळखले जातात.हाच धागा पकडून माने यांनी चित्रकार खिलारे यांना अजित चव्हाण यांचे चित्र रेखाटण्याची विनंती केली.त्यांच्या चित्राची फ्रेम व पुस्तक भेट देवून माने यांनी अजित चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कुंदन हुलावळे हेही उपस्थित होते. सध्या भारतीय सणांचे वास्तववादी दर्शन घडविणारी खिलारे यांची चित्रे जर्मनीच्या बर्मन शहरात रसिकांची वाहवा मिळवीत असतानाच आपले व्यक्तिचित्र पाहून अजित चव्हाण प्रभावित झाले त्यांनी नितीन खिलारे यांच्या चित्रकला कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले आणि आभारही मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group