पोमलवाडी ता. करमाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साकारलाय तालुक्यातील सर्वात मोठा पहीला सुसज्ज संगणक कक्ष
पोमलवाडी प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील पोमलवाडी ग्रामपंचायत, शालेय शिक्षण समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. पोमलवाडी, सरपंच संग्राम पाटील मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थांतर्फे दिनांक-३/१०/२२ सोमवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली व तेथील गार्डनमधे वृक्षारोपन करण्यात आले.. येथील तरुणांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात गार्डन तयार केलेले असुन या ठिकाणी एक आकर्षक बागबगिचा तयार होत आहे.. तसेच पोमलवाडी येथिल कु. मोनाली भोपते व कुटुंबियांनी पोमलवाडी प्राथमिक शाळेला २० संगणक संच भेट दिलेले असुन, सुसज्ज लॅब तयार करण्यात आली आहे, तसेच शाळेत सुसज्ज इनडोअर गेम्स हॉल, सायन्स हॉल तयार करणात आलेला आहे.. शालेय परिसरासह पोमाई मंदीर परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे वृक्षारोपन करण्यात आले आहे… या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अनिल पानसरे गुरुजी यांनी केले.. प्रास्ताविक श्री. सिंकदर शेख गुरुजी यांनी केले.. या वेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.. याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत यांनी पोमलवाडी ग्रामस्थांचे, सरपंच आरडे, उपसरपंच हनुमंत भोपते, सर्व सदस्य आणि सुजान ग्रामस्थ, शिक्षक यांचे अभिनंदन केले.. पोमलवाडी गावातील संगणक कक्ष, सायन्स वॉल, इनडोअर गेम्स हॉल चे कौतुक केले.. याप्रसंगी गणेश करे पाटील यांनी देखिल मौलिक विचार मांडले आणि गावचा गुणगौरव केला.. याप्रसंगी उपस्थित आय टी इंजिनियर मोनाली भोपते, माजी सरपंच संग्राम पाटील, संभाजी भोपते यांचाही विशेष गौरव करण्यात आला.. यावेळी ग्रामसेवक तानाजी येडे, केंद्राध्यक्ष विकास काळे, सरपंच उमेश आरडे, तुळशीदास भोपते, हरि बाबर, उकले साहेब, राजेंद्र देवकर, पोपटराव फाळके, संजय देवकर, राजेंद्र उगले, प्रमोद खाटमोडे, पिटु काळे, लक्ष्मण फडतरे सर , महादेव गायकवाड, यशवंत काळे, डिगांबर पिसाळ..यांचेसह ग्रामस्थ,महिला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
