Monday, April 21, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळासकारात्मक

करमाळयाची आई कमलाभवानीची माही डेकोरेशनच्यावतीने गोडसे बंधुची आजोबाच्या स्मरणार्थ नवरात्रीची विना मोबदला सेवा 

 श्री कमलाभवानी देवीचा नवरात्रोत्सव दि. २६ सप्टेंबर पासुन सुरू झाला. या नवरात्रौत्सवात ‘माही डेकोरेटर्स’ यांनी मंदीर आणि परीसरात केलेली फुलांची सजावट ही भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात ‘माही डेकोरेटर्स’चे गोडसे बंधु त्यांच्या आजोबांच्या स्मरणार्थ सेवेकरी बाळासाहेब बाबा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने सजावटीची ही सेवा देवीच्या चरणी अर्पण करतात.

दररोजची नविन सजावट करताना देवीच्या शालुचा जो रंग असणार आहे, त्याच रंगाच्या ओरिजनल फुलांचा वापर गोडसे बंधु करतात. निवडक आणि ताज्या फुलांच्या वापर, नाविन्यपूर्ण मांडणी, कारागीरांचे नियोजन, सजावटीसाठी मिळणारी ठराविक आणि मर्यादित वेळ, दर्शन सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान अशा अनेक जबाबदा-यांचा सामना करत भाविकांना मंत्रमुग्ध करणारी सजावटीची ही जोखीम गोडसे बंधु पूर्णत्वाला आणतात. मंदिरात दररोज नव्याने होणारी सजावट चित्रित करुन त्याचे स्टेटस करमाळा परीसरासह पूर्ण महाराष्ट्रातील भक्तांपर्यंत पोहचवण्यासाठी हौशी लोक आतुरतेने वाट पाहतात. सोशल मेडियाच्या माध्यमातून रोजच्या रोज सजावटीचे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहचत आहेत. महाराष्ट्रभर त्याची वाहवा होते.
याबाबत बोलताना उमेश गोडसे म्हणतात की, मर्यादित वेळेत सर्व सजावट व्यवस्थितपणे होणे अशक्यप्राय गोष्ट असते.फक्त ३ ते ४ तास झोप, फुलांची टंचाई, रोजच्या रोज नवीन सजावटीचे नियोजन आणि देखभाल हे काम तसं पाहता अवघडच आहे परंतु आई कमलाभवानीच्या आशिर्वादाने रोजच्या रोज नवीन ऊर्जा आमच्यात संचारते आणि रोज नवनवीन आणि कलात्मक सजावट आम्ही सादर करु शकतो. 
मंगेश गोडसे म्हणतात की दरवर्षी ‘माही डेकोरेटर्स’च्या माध्यमातून गोडसे परीवार ही सेवा रुजू करतात. यावेळी रंभापुरा भागातील महिला भगिनींचे सहकार्य लाभते. महेश गोडसे, अशोक गोळे, अनुराग करंडे, ओंकार राऊत, रोहित पवार, सागर जाधव, आकाश गरड, समाधान गोळे, दिनेश गोळे, सोनु जाधव, सागर गोळे, धिरज गोळे
यांच्यासह अनेक जण मोलाचे सहकार्य करतात.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group