करमाळ्याची श्रेया शरद कोकीळ हिची जम्मू काश्मीर येथे निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शरद देवेंद्र कोकीळ यांची कन्या कुमारी श्रेया शरद कोकीळ हीची भारतामधून राष्ट्रीय स्तरावर Council of Science and Research Institute (CSIR) – Indian Institute of Integrative Medicine (IIIM) – जम्मू काश्मीर येथे Research Scholar
जिथे संपूर्ण भारतातून निवडक पाच विद्यार्थ्यांची निवड केली जाते, त्यामध्ये श्रेया शरद कोकीळ हिची निवड करण्यात आली आहे,
तिच्या निवडीबद्दल तिचे अभिनंदन भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले,
यावेळी गणेश चिवटे म्हणाले की शरद कोकीळ यांनी खूप कठीण प्रसंगातून मुला मुलींना चांगले संस्कार देऊन शिक्षण दिले आहे, त्यांच्या कष्टाचे चीज त्यांच्या मुलीने केले आहे , श्रेयाचा आदर्श घेऊन करमाळा तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांचे नाव लौकिक करावे असे आव्हान गणेश चिवटे यांनी विद्यार्थ्यांना केले,
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,उद्योजक मोहन शिंदे, आजिनाथ सुरवसे ,जयंत काळे पाटील, अमोल पवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
