करमाळा

व्यंकटेशा चारिटेबल ट्रस्ट कांलिदा फाउंडेशनच्या वतीने लक्ष्मण बुधवंत यांचे कार्य प्रेरणादायी – पत्रकार दिनेश मडके

 करमाळा प्रतिनीधी वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट,कालिंदा फाऊंडेशनच्यावतीने लक्ष्मण बुधवंत यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत करमाळा तालुका डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले.रावगाव येथे संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची पालखी आल्यानंतर वारकरी भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले . पालखी वारीमध्ये आलेल्या सर्व वारकरी मंडळीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. उद्योजक रणजित दादा नलवडे मिञ परिवार मकाईचे कारखान्याचे संचालक.गोवर्धन आबा करगळ,रावगांवचे मां.सरपंच विलास बर्डे, नाना जाधव,समता परिषदचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, सदस्य संदीप शेळके, भागेश्वर बरडे सुभाष काळे पाटील उपस्थित होते..
रावगाव येथील वेणू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून धर्मकार्य म्हणून वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी अडीच हजार बिसलरी पाणी बॉटलचे वाटप केले आहे.मनुष्य परिस्थितीने किती श्रीमंत असला तरी मनाने श्रीमंत असणे गरजेचे आहे. मध्यमवर्गीय परिस्थिती असतानाही धर्मकार्यासाठी आपले उत्पन्नाचा काही भाग खर्च करणे हे आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे त्यांचे तंतोतंत पालन लक्ष्मण बुधवंत करत असून रावगाव येथे तिरुपती बालाजी मंदिराचे बांधकाम काम ते सध्या करत आहेत.तिरुपती बालाजी मंदिरासाठी त्यांच्या आईने बारा गुंठे जागा दिली आहे.बालाजी मंदिराचे काम प्रगतीपथावर असुन या कार्यात त्यांना मदत करण्याचे आवाहन पत्रकार दिनेश मडके यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group