करमाळा

संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखी दिंडीतील वारकऱ्यांना करमाळा जेऊर रोड चालक-मालक संघटनेच्यावतीने मसाला दुधाचे वाटप

 

करमाळा प्रतिनिधी:

करमाळा: दि. २२/ करमाळा तालुका शहरात करमाळा जेऊर रोड चालक-मालक संघटनेतर्फे वारकऱ्यांना मसाला दूध वाटत करण्यात आले. पाच ते सहा वर्षांपासून ही चालक-मालक संघटना वारकऱ्यांची दरवर्षी सेवा करत आहे. कधी चहा कधी नाष्टा कधी दूध असे दरवर्षी काही ना काही वारकऱ्यांना देण्यात येते. संघटनेतील सर्वजण मोठ्या आवडीने सर्वजण वारकऱ्यांची सेवा करत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही चालक-मालक संघटनेतर्फे वारकऱ्यांना मसाला दूध वाटप करण्यात आले.यावेळी मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे, संभाजी (बापू) होनप, बाळासाहेब शिर्के, पत्रकार सूर्यकांत (आप्पा) होनप, पप्पू घोगरे, बाला चव्हाण, सुधाकर पवार, संतोष यादव, संजय साने, समीर तांबोळी, नितीन यादव, सलीम शेख, पप्पू लष्कर, बबलू भोज, नागनाथ कणसे, जितू भोसले, राकेश आवटे, मारुती कानगुडे, शुक्रेश्वर खंडागळे, दत्ता झोळे, आजिनाथ झोळे, किरण दळवी, रवी यादव, प्रशांत कांबळे, पप्पू कोळी, बाळू रंधवे, नितीन साबळे, राजू लांडगे, अशोक अंधारे, मच्छिंद्र क्षीरसागर, सुदर्शन पाटोळे, सोमनाथ विटकर, उमेश गिरमकर, इं‌. चालक-मालक संघटनेतील सर्वजण उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group