प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन माणुसकीचा धर्म पाळणारे सतीश बाळासाहेब यांची जोडी
प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग होऊन माणुसकीचे धर्म पाळणारे सतीश बाळासाहेबांची जोडी आहे. सध्याच्या युगामध्ये माणूस माणसाला विसरत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये माणुसकीच्या भावनेतून प्रत्येकाच्या लग्नकार्य समारंभाला उपस्थिती त्याला आशीर्वाद देणारी एक अवलिया जोडी म्हणून करमाळा शहरातील बाळासाहेब व सतीशराव यांची जोडी प्रसिद्ध आहे दिल दोस्ती दुनियादारी मध्ये प्रत्येक जण आज पैशाच्या मागे लागला आहे नाते बंद मैत्री प्रेम जिव्हाळा या सद्भभावना पैसा असणाऱ्या माणसाकडे क्वचितच आढळून येतात कारण पैसा सर्वस्व माणून जीवन जगणारे लोकांना अंजन घालणारी ही जोडी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्याला आधार देणारी ठरली आहे. गरीब श्रीमंत असा भेद न म्हणणारे सर्वांना आपलै मानणारे ही जोडी अवलिया आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती बदलली की माणसे आपल्या परिस्थितीनुसार मित्र निर्माण करतात व त्यांच्याच कार्याला उपस्थित राहून शुभेच्छा देतात अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही जाती भेद न मानता मानवता हाच खरा धर्म असे मानून असे काम करणारे मानसी माणसाच्या हृदयामध्ये आपली जागा निर्माण करतात पैशाने श्रीमंत असणारी माणसे माणसात मोठीच असतात असे नाही पैशापेक्षा माणुसकी धर्म पाळुन प्रत्येकाला आपले मानून मानवता धर्म पाळणारे बाळासाहेब सतीश यांची जोडी करमाळा शहराची भूषण आहेआजच्या कृत्रिम जगामध्ये कामापुरते बोलणारी नातं निर्माण करणारी माणसे असून ही माणसे व्यवहारात जरी यशस्वी झाली तर दिल दोस्ती दुनियादारीमध्ये त्यांची किंमत शुन्य आहे अशा परिस्थितीत प्रेम जिव्हाळयाने माणुसकीचा धर्म पाळणारी मनाने श्रीमंत असणारी सतिश बाळासाहेब यांची जोडी आजच्या युगामध्ये आदर्श आहे.
