मातोश्री देवी अहिल्याबाई होळकर पालखी सोहळयाचे मुस्लिम समाजाकडुन स्वागत
करमाळा प्रतिनिधी
पंढरपुर येथील आषाढी वारी निमित्त मध्यप्रदेश मधील इंदौर वरुन आलेल्या पालखी सोहळ्याचे आगमन करमाळ्यात मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांच्या कड़े आल्यानंतर करमाळा शहरातील सर्व मुस्लिम बांधवानी दिंडीचे स्वागत केले सदरची दिंडी ही अनेक वर्षापासुन करमाळा येथे मुक्कामासाठी येते याचे सर्व नियोजन नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी करतात गेली अनेक वर्षापासुन तांबोळी परीवार ही सेवा बजावत आहे
या बाबत दिंडी तील प्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही सर्व जण महाराष्ट्रीयन आहे परंतु आमचे पुर्वज मध्यप्रदेशात व्यवसायासाठी गेली होती ती त्याठिकाणी स्थायीक झाली परंतु त्यांनी इंदौर जवळील वंसीप्रेस येथे श्री,संत ज्ञानेश्वर महाराजाच्या नावाने भजन मंडळ काढुन गेली चौवीस वर्षापासुन पालखी चालु केली आहे सदरची दिंडी ही ह,भ,प प्रेमचंद शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी वाहनाने चौड़ी या ठिकाणी येतात या ठिकाणी पहिला मुक्काम करतात तर चौंडी ते पंढरपुर हां प्रवास या दिंडी तील वारकरी पायी करतात त्यांचा दुसरा मुक्काम करमाळा येथे नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या कड़े असते याचे संपुर्ण नियोजन युवा नेते अमीरशेठ तांबोळी, एजाजशेठ तांबोळी तसेच मुस्लिम बांधवाकडे सेवा असते
सदर दिंडीचे आगमन झाल्यानंतर तांबोळी परिवाराच्या वतीने इजाजशेठ तांबोळी ,करमाळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया,करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, वाजीद शेख इंदाज वस्ताद मोहसिन पठान नासीर कबीर आशपाक सय्यद आलीम शेख साबीर तांबोळी , जयमहाराष्टू मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी स्वागत केले दिंडीत आलेल्या सर्व वारकरी यांच्या साठी उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या दिंडीत महिला वारकरी ची संख्या लक्षणीय असुन या दिंडीत भजन कीर्तन हरिपाठ भजन जागर असे दैनंदिन कार्यक्रम पालखी सोहळ्यात होतात अशी माहिती शास्त्री महाराज यांनी दिली आहे.