भाजप युवा मोर्चाच्या वतीने तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त डान्स स्पर्धा व काव्य संमेलन संपन्न
करमाळा प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 23/ 10 /2021 रोजी डान्स स्पर्धेचे आयोजन विकी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते, या स्पर्धेचे उद्घाटन सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर ,जिल्हा परिषद सदस्य सातारा यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित नाईक निंबाळकर ,सौ शहा मॅडम भाजपा कार्यकारिणी सदस्य सातारा , करमाळा नगरपालिकेच्या नगरसेविका स्वाती फंड ,संगीता खाटेर, पत्रकार अश्पाक सय्यद ,जयंत दळवी, सुमित जाधव महावितरण अभियंता , दत्तात्रय चोपडे गुरुजी आदीजण उपस्थित होते ,
या स्पर्धेत भिगवण, दौंड ,अकलूज ,टेंभुर्णी ,पुणे व करमाळ्यातील विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता, यावेळी शास्त्रीय ,फिल्मी व वेस्टर्न अशा प्रकारात नृत्य स्पर्धा पाच ते दहा या वेळेत संपन्न झाल्या, या स्पर्धेत परीक्षक म्हणून लक्ष्मण लष्कर ,बाळासाहेब नरारे ,एल. यु .कांबळे, निलेश भुसारे यांनी काम पाहिले, डान्स स्पर्धेच्या लहान गटात प्रथम क्रमांक धनश्री कानतोडे,
द्वितीय क्रमांक हिंदवी जानभरे, विभागून तृतीय क्रमांक समीक्षा सकट व माही माने ,मोठ्या गटात प्रथम क्रमांक ऋतुजा सदाफुले, द्वितीय क्रमांक गोपिका नायर ,तृतीय क्रमांक राजू टिकरे यांनी पटकावला ,तसेच युवा साहित्य मंच करमाळा यांच्या वतीने रविवार दिनांक 24 /10/2021 रोजी कन्यादेवी कन्या प्रशाला येथे काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन बाबूराव हिरडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीष्माचार्य चांदणे हे होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जीवन धेंडे ,गणेश करे पाटील, अपर्णा शिंदे ,सुनीता देवी ,एम.एन.जगदाळे ,दिनेश मडके ,सचिन जव्हेरी, शेखर स्वामी आदीजण उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा व युवा साहित्य मंच यांनी परिश्रम घेतले,
