किंडरजाॅय स्कुलमध्ये अवतरले प्रत्यक्षात विठ्ठल रखुमाई
करमाळा प्रतिनिधी : – शनिवार दिनांक 24 / 6/23 रोजी
सर्व करमाळ्यात आषाढी वारी दिंडीचे वातावरण चालू आहे .या वातावरणात मध्ये आपल्याही मुलांनी समरस होण्यासाठी, वारकऱ्यांशी आपल्या मुलांची ओळख व्हावी, दिंडीचा आनंद आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, यासाठी आज आपल्या किंडर जॉय इंग्लिश मेडीयम स्कूल या शाळेने दिंडीचे आयोजन केले होते .आपले दिंडी ही आपल्या शाळेपासून ते कमला भवानी मंदिर येथे नेण्यात आली . सर्व विद्यार्थी माऊली माऊली, ज्ञानबा तुकाराम याचा जयघोष करत दिंडी कमला भवानी मंदिरात पोहोचली . तिथे गेल्यावर सर्व वारकऱ्यांनी त्यांचे खूप कौतुक केले . काही वारकरी त्यांच्याबरोबर नाचले, फुगड्या खेळल्या, तर काही वारकऱ्यांनी फोटोसेशनही केले .काही वारकरी आपल्या माऊलींच्या पाया देखील पडत होते .सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या दिंडीचा पुरेपूर आनंद घेतला . दिंडीच्या निमित्ताने सर्वांना दिंडी चे महत्व व वारकरी लोक पंढरपुरात पर्यंत दिंडी मध्ये चालत जातात .एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले . सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना छान वारकऱ्यांच्या रूपात आवरून पाठवले होते . आपली विठ्ठल रुक्माई तर पंढरपूर वरून थेट इथे अवतरल्या सारखी वाटत होती . वारकरी मंडळाचे असे म्हणणे आले की पंढरपूर पुरात जाण्या अगोदरच आम्हाला विठ्ठल रुक्माई चे दर्शन झाले .
आपल्या शाळेचे दिंडीचे नियोजन अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या पार पडले .
सर्व पालकांचे आपल्या शाळेच्या संचालिका सौं राजश्री कांबळे यांनी अभिनंदन व आभार मानले.दिंडीच्या निमित्ताने आज आपले विद्यार्थी एक पाऊल पुढे समाजापर्यंत पोहोचली आहेत . दिंडीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे अश्या प्रतिक्रिया पालकवर्गातून एकावयास मिळत होत्या.
