वै ब्र .भु.सदगुरु रघुनाथ महाराज उंबरेकर वृध्देश्वर देवस्थान ते पंढरपुर पायी दिंडीचे साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने भव्य स्वागत
करमाळा प्रतिनिधी वै ब्र .भु.सदगुरु रघुनाथ महाराज उंबरेकर व वै गुरूवर्य पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांच्या आशिवादाने व श्री ह भ प भागवत महाराज उंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र वृध्देश्वर ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडीचे स्वागत साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली करमाळा यांच्यावतीने करण्यात आले .गेल्या २२ वर्षापासुन हा सोहळा अखंडपणे चालु आहे .दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाले असुन यंदाच्या वर्षी साडे तिनशे ते चारशे वारकरी सहभागी झाले असुन यात पुरुष व महिला यांचा समावेश आहे. या दिंडीमध्ये-पहाटे ५ वा काकडा भजन व नंतर राम कृष्ण हरी भजन दु.जेवन व राम कृष्ण हरी भजन सायंकाळी ७ते ९ किर्तन व नंतर भोजन व विश्रांती असा दिनक्रम असल्याचे ह.भ.प.भागवत महाराज यांनी सांगितले. दिंडीच्या समवेत श्री चांगदेव महाराज शेडाळकर.मच्छिंद्र म उंबरेकर,शिवाजी म आडसरे. आण्णा आडसरे. बप्पा चोथे.विलास घोलप शिवाजी भाकरे पोपट पाठक दिंडी विणेकरी हरीभाऊ पाठक हे असुन दिंडीचा सोहळा संप्पन करण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडीच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करमाळा शहरातील कुंकु गल्लीतील साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आली. महिला भगिनींनी वृध्देश्वर दिंडी पालखीचे स्वागत करुन वारकरी व भाविकांना अन्नदान केले या दिंडीच्या स्वागताला युवक तरुण अबाल वृध्दासह महिला यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेऊन विठु नामाच्या गजर करुन हरीनामाचा जयजयकार करुन दिंडी सोहळा आनंदात संप्पंन झाला.
