जगताप कुटुंबीयांकङुन श्री.शनैश्वर पायी दिंङी ( पोथरे ) व श्री क्षेत्र रामेश्वर पायी दिंङी ( सौताङा ) चे जल्लोषात स्वागत !
करमाळा प्रतिनिधी सध्या आषाढी वारी साठी वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असणाऱ्या पंढरपुरकडे पायी दिंडी सोहळ्याचे संपुर्ण महाराष्ट्रातुन वारे वाहत असताना करमाळा तालुक्यातील श्री शनैश्वर पायी दिंडी सोहळा पोथरे या दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांचे अल्पउपहाराचे नियोजन बाईसाहेब श्रीमती रत्नप्रभा जगताप, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.चिंतामणी दादा जगताप,करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री.राहुलभैय्या जगताप, अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री प्रतापराव जगताप यांनी आपल्या निवासस्थानी भक्तीमय वातावरणात व जल्लोषात स्वागत केले.या पायी दिंडीमध्ये 200 वारकऱ्यांचा सहभाग होता.या दिंडीचे कोरोनाचा अपवाद वगळता सलग 29 वे वर्ष असुन या पायी दिंडीतुन सामाजिक प्रबोधनही केले जाते हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे.हि दिंडी पोथरे पासुन प्रारंभ झाल्यापासुन सरपडोह, वडशिवणे,सापटणे,व्होळे, वाखरी ते पंढरपुर असा प्रवास असुन दिंडीतील प्रमुख श्री.संदिप पाटील ,श्री.बंडोपंत कुलकर्णी,श्री दत्तात्रय नंदुरगे हे उत्तम नियोजन करतात.
तसेच आज दिनांक 5 जुलै रोजी श्री क्षेत्र रामेश्वर पायी दिंडी सौताडा या दिंडीचे आगमन आज करमाळा शहरातील जगताप यांच्या निवासस्थानी झाले.ह.भ.प.पांडुरंग प्रभाकर देशमुख(शास्त्री) व श्री पांडु(देवा) शास्त्री यांच्यासह 400 वारकऱ्यांचा या दिंडीत सहभाग असुन या दिंडीचे हे प्रथम वर्ष आहे.या दिंडीचे स्वागत व अल्पोहाराचे नियोजन सकाळी ९ वाजता जगताप बंधुंनी मेन रोङ येथील नामरत्न काॅम्पलेक्स येथे केले .या दिंडीची सुरुवात सौताडा येथुन होऊन जिक्री,पोथरे,शेलगाव,कंदर,परीते अजोती ते पंढरपुर असा असुन सदर दिंडी दिनांक 9 जुलै रोजी पंढरपुरला पोहचते. दोन्ही दिःङींचे आयोजक व वारकऱ्यांनी जगताप कुटुंबीयांना भरभरून आशिर्वाद दिले.
