करमाळा

करमाळ्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार ‌ सौ शिल्पाताई ठोकडे मॅडमनी सोडवला अनेक वर्षाचा शेतातील रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांच्यावतीने मकाईचे संचालक रामभाऊ हाके यांच्या हस्ते सत्कार संपन्न

.करमाळा प्रतिनिधी*
शेतातील रस्त्याचा प्रश्न बरीच वर्षे ‌ रखडला होता. ‌ करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार ‌ सौ शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी संबंधित शेतकऱ्यांशी आपसात चर्चा करून सामंजस्यांनी कित्येक वर्षाचा शेतातील रस्त्याचा प्रश्न सोडवला. श्री विठ्ठल शेजाळ व सौ. भिकाताई पडळकर यांच्या शेतामधून ‌ रस्ता देण्यात आला ‌.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा या योजनेअंतर्गत श्री विठ्ठल शेजाळ आणि सौ. भिकाताई पडळकर यांच्या शेती मधून रस्ता देण्यात आला व त्या रस्त्याचे उद्घघाटन करमाळा तालुक्याच्या तहसीलदार मा. शिल्पाताई ठोकडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री संतोष गोसावी भाऊसाहेब, मंडळ अधिकारी जिंती तसेच कावळवाडी गावचे ग्राम महसूल अधिकारी श्री संजय शेटे भाऊसाहेब, अध्यक्ष करमाळा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटना यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री रामभाऊ हाके, कावळवाडी गावचे सरपंच तुषार हाके, माजी उपसरपंच पोपट शेजाळ, उपसरपंच मुकेश पावणे, दत्तात्रय हाके, तुकाराम हाके, कोंडीबा हाके, माजी सरपंच येताळा शेजाळ, बापू शेजाळ विठ्ठल शेजाळ, अंबादास हाके, डॉ हबा देवकाते, कावळवाडी गावचे पोलीस पाटील सुरेश शेजाळ व सर्व कावळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांचा मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री रामभाऊ हाके यांच्या परिवारातर्फे त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी अनेक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!