गुढीपाडवा ते रामनवमी घरकुल बांधकाम सप्ताहामध्ये 52 लाभार्थ्याना मिळाले हक्काचे घर लाभार्थ्यांनी घरावर गुढी उभी करून आनंद साजरा – मनोज राऊत
प्रतिनिधी पंचायत समिती करमाळा अंतर्गत गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22 मार्च 2023 ते 30 मार्च 2023 अखेर घरकुल बांधकाम आवास सप्ताहाचे आयोजन केले होते. अशी माहिती करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत यांनी दिली
सदर आवास अभियान कालावधीमध्ये घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःचे हक्काचे घरावर लाभार्थींनी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा केलेला आहे आवास अभियान कालावधीमध्ये 62 घरकुलाचे कारनामे या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत
तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेंतर्गत मोजे जिंती येथील अनुसूचित जमातीच्या दोन लाभार्थी ,मोजे शेलगाव येथील अनुसूचित जातीचे दोन लाभार्थी मोजे पोथरे येथील भटक्या जमातीच्या एक लाभार्थी असे एकूण पाच घरकुल लाभार्थीने जागा खरेदी केली असून त्यांचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केलेले होते
त्यास मान्यता मिळालेले असून सदर लाभार्थींनी शासन नियमानुसार गावाच्या रेडीरेकनर दरानुसार अनुदान मंजूर करून त्यांचे खाते वरती अनुदान जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सदर आवास सप्ताह कालावधीत छत्तीस घरकुल लाभार्थींनी पहिला हप्ता रक्कम रुपये पाच लाख 40 हजार
79 लाभार्थीने दुसरा हप्ता रक्कम रुपये 47 लाख 80 हजार
55 लाभार्थींना तिसरा हफ्ता रक्कम रुपये 21 लाख 70 हजार
15 लाभार्थींना चौथा हप्ता रक्कम रुपये दोन लाख 80 हजार असे एकूण रक्कम रुपये 77 लाख 70 हजार एवढ्या अनुदान गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22 मार्च 2023 ते 30 मार्च 2023 अखेर घरकुल लाभार्थींच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले आहे तसेच सदर आवास सप्ताहामध्ये बावन घरकुल लाभार्थींना हक्काचे घर मिळालेले आहे.
