Monday, April 21, 2025
Latest:
सकारात्मक

यशवंत भैय्याने गावचा कारभार सांभाळून सुवर्ण पदकापर्यंतची भरारी गावाच्या कौतुकास पात्र नाव देशपातळीवर नेल्याचा अभिमान-आमदार बबनदादा शिंदे

निमगाव प्रतिनिधी
अतिशय प्रयत्न , जिद्द , चिकाटी ठेवली तर कोणतेही गोष्ट अवघड नाही यशवंत भैय्याने गावचा कारभार सांभाळून सुवर्ण पदकापर्यंत मारलेली भरारी , नक्कीच गावाच्या कौतुकास पात्र असून गावाचे नाव देशपातळीवर नेल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले .
जयपुर येथे झालेल्या 31 व्या ऑल इंडिया जि. व्ही. मावलकर चॅम्पियन सिंगल ट्रॅप स्पर्धेमध्ये निमगाव टें चे सरपंच यशवंत भैय्या संजयमामा शिंदे यांनी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल निमगाव टें ग्रामस्थांच्या वतीने आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . 
मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने निमगाव टें तालुका माढा येथे भव्य नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते यशवंत भैय्या शिंदे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला . तसेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने देशात एक नंबरचे गाळप केल्याबद्दल आमदार बबनराव शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे , माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे , युवक नेते कृष्णा शिंदे , प्रवीण पाटील  , तहसीलदार अजिंक्य शेंडे ,  माजी सरपंच रविंद्र शिंदे , शशीभाऊ शिंदे , ग्रामसेवक सतीश दौंड,  सुजित बागल , ॲड . अशोक मराठे , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , डॉ . बडवे , पोपट खापरे , विकास शिंदे , ग्रामपंचायत सदस्य सुनील खापरे , ग्रामपंचायत सदस्य सुनील खापरे , सदस्य प्रताप शिंदे , उदय शिंदे , नितीन मराठे , मनोज लोंढे , प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील , युवराज शिंदे, सोमनाथ शिंदे , सुरेश शिंदे , गणेश कवडे , विकास शिंदे , अशोक शिंदे , सुनील शिंदे , अक्षय इंगळे , बालाजी मेहेर , अमोल सातपुते , अभिजीत परबत , अविनाश काशीद , दादासाहेब शिंदे  ,रंजीत भोसले ,  विजेंद्र शिंदे ,  भाऊ शिंदे , श्रीकांत चौधरी ,  बाळासाहेब शिंदे , संतोष गरड , महेश रजपूत , गणेश गुरव  उपस्थित होते .
सत्काराला उत्तर देताना यशवंत भैय्या शिंदे म्हणाले की , निमगाव सारख्या ग्रामीण भागातल्या तरुणाने गोल्ड मेडल मिळवणे ही फार मोठी गोष्ट असून या पाठीमागे माझ्या आई , वडील आणि पत्नीचा मोठा वाटा आहे . यावेळी सोमनाथ शिंदे , तहसीलदार अजिंक्य शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले . सुत्रसंचलन विलास दौलतोडे यांनी केले . प्रारंभी सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांचे निमगाव येथे आगमन झाल्यानंतर गावातुन घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली . यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group