Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

दिवाळीच्या कालावधीत महावितरणने अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा ठेवावा- भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल

 

केत्तूर (अभय माने) दिवाळी हा दिव्यांचा सण असल्यामुळे महावितरणने शहरासह तालुक्यातील ( शहर व ग्रामीण भागातील) वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत राखण्याच्या प्रयत्न करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी महावितरणकडे केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामान्य ग्राहकांची किराणा दुकाने, कापड दुकाने, मिठाईची दुकाने इत्यादी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी असते. अशात वीजपुरवठा खंडित झाला तर ग्राहक आणि दुकानदार या दोघांनाही व्यत्यय येतो. तसेच दिवाळी हा प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण असल्यामुळे घराघरांतून आकाशकंदील लावून रोषणाई करण्यात येते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत महावितरणने वीज ग्राहकांना अखंड वीजपुरवठा देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आगरवाल यांनी केली आहे.

सध्या परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे कृषी पंप बंद आहेत. वीजपुरवठ्यातुन हा मोठा मोठा भार कमी असल्याने ग्रामीण भागासह शहरातही अखंड वीजपुरवठा होण्यासाठी अडचणी येणार नाहीत. म्हणून महावितरणने अखंडित वीजपुरवठा ठेवावा. ऐन दिवाळीत वीजेचा लपंडाव आढळून आल्यास भाजपतर्फे ‘दिवाळीत होळी’ समजून महावितरण कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशाराही शहराध्यक्ष आगरवाल यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group