करमाळा शहरात डेंग्यु साथ रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सुनील बापू सावंत मुख्याधिकारी यांच्याकडे केली येत्या दोन दिवसात फवारणी करण्याचे दिले आश्वासन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात सध्या डेंगूचा प्रसार वाढत असून याकडे करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी त्वरित लक्ष देऊन करमाळा शहरात प्रत्येक वार्डात जंतुनाशक विरोधी फवारणी करावी अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सुनील बापू सावंत यांनी भ्रमण दूरध्वनीद्वारे लोंढे यांच्याकडे केली आहे.
करमाळा शहरातील प्रत्येक वार्डात घाणीचे वाढते साम्राज्य वाढले असून डासाचे वाढते प्रमाण झाले आहे यामुळेच डेंगू हा जीवघेणा रोग करमाळा शहरात फैलावत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते सुनील बापू सावंत यांनी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोंढे यांना भ्रमण दूरध्वनी द्वारे लक्ष वेधले असता लोंढे म्हणाले की फवारणी करणे ची मशीन सध्या नादुरुस्त असून येत्या दोन दिवसात सदर मशीन दुरुस्त होईल व त्यानंतर फवारणी केली जाईल अशी लोंढे यांनी सावंत यांना मेसेज पाठवला आहे.
सध्या करमाळा शहरात प्रत्येक खाजगी दवाखान्यात डेंगूसदृश्य रुग्ण वाढत असून आरोग्य अधिकारी याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे याकडे युवा नेते सावंत यांनी लक्ष वेधल्यामुळेच लोंढे यांनी त्यांच्या या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन शहरात येत्या दोन दिवसात फवारणी करण्याचे आश्वासन दिले आहे
