Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा सेलपदी सुहास घोलप


करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रज्ञा सेल (बुद्धिजीवी) पदी करमाळा येथील सुहास घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निवड सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी संघटनात्मक घोषणापत्र देऊन सांगोला येथील भारतीय जनता पार्टी पश्चिम विभाग जिल्हा कार्यालयात केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हासरचिटणीस सचिन शिंदे, प्रदेश निमंत्रित सदस्य दीपक चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष शशिकांत पवार, जिल्हाध्यक्ष व्यापार आघाडी राजेंद्र जबडे, माळशिरसचे विधानसभा विस्तारक नाना वर्पे तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर घोलप म्हणाले की प्रज्ञा सेल मधील पत्रकार, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, शिक्षक, लेखक, कवी आदी विचारवंतास भारतीय जनता पार्टीचे लक्ष व धोरणे समजावून भारतीय जनता पार्टीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम भविष्यात तन मन धनाने करील. निवडीनंतर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजीतसिंह मोहितेपाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते, आमदार राजेंद्र राऊत, भाजपा नेते धैर्यशील मोहितेपाटील, माढा लोकसभा संयोजक राजकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस पूर्व शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष पश्चिम चेतनसिंह केदार-सावंतसह जिल्ह्यातील पदाधिकारी, पुढारी, नेते व कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे घोलप यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. घोलप यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group