करमाळा

शिवसेना महिला नेत्या प्रियांका गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश – अखेर लोकमान्य टिळक पुतळा परिसरातील धोकादायक झाड काढले


करमाळा प्रतिनिधी :- किल्ला विभाग करमाळा येथे लोकमान्य टिळक यांचा पुतळा असून पुतळा परिसरात गुलमोहराचे जुने झाड होते. सदरचे झाड धोकादायक झाल्याने ते काढण्यासाठी शिवसेनेच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी करमाळा नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी बालाजी लोंढे याना दि. ०५/०८/२०२२ रोजी लेखी निवेदन देऊन झाड काढण्याबाबत कळविले होते. परंतु नगरपरिषदेकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने व दि. ०६/११/२०२३ रोजी सदर झाडाची मोठी फांदी कोसळली त्यावेळी १५ ते २० लहान मुले सुदैवाने वाचली. कोसळलेल्या फांदीमुळे पुतळ्याच्या छत्रीचे नुकसान झाले आहे. घडलेल्या प्रकारामुळे गायकवाड यांनी नगरपरिषदेस पुन्हा दि. ०८/११/२०२३ रोजी लेखी निवेदन देऊन मुख्याधिकारी यांच्याशी समक्ष भेटून चर्चा करून झाड काढण्याबाबत चर्चा केली व यावेळी ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा निवेदनामध्ये दिला होता. तसेच किल्ला विभागातील नागरिकांच्या सह्या घेऊन आणखी एक अर्जही नगरपरिषदेस देण्यात आला होता. त्यानुसार नगरपरिषदेने सदर धोकादायक झाड काढून घेतल्याने गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांचे दूरध्वनीद्वारे आभार मानले तसेच गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने किल्ला विभाग परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!