करमाळा

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचं भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणार केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनावरण समारंभ घेण्याचा मानस-प्रा. शिवाजीराव बंडगर

करमाळा प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्या देवी होळकर यांचं भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणार आहे.अशी माहिती अहिल्यादेवी स्मारक समितीचे सदस्य प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी दिली. या संबंधाने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्मारक समितीची अधिकृत बैठक समिती चे अध्यक्ष तथा सोलापूर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवन सोलापूर येथे पार पडली .
या प्रसंगी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, स्मारक समिती च्या कार्याध्यक्षा तथा विद्यापीठाच्या कुलगुरू म्रणालिनी फडणवीस, स्मारक समिती चे सदस्य तथा विध्यापीठ नामांतर समिती चे अध्यक्ष प्रा शिवाजीराव बंडगर, शिवाजीराजे कांबळे, माऊली हळणवर, अमोल कारंडे, बापू मेटकरी,नागेश वाघमोडे ,भारत माने ,विष्णू बिचकुले आदी उपस्थित होते.
दिल्ली स्थित प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यानी तयार केलेला पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाक्रती पुतळा विध्यापीठात दाखल झाला आहे . लवकरच त्याचे अनावरण होणार आहे. या बाबत मंत्री विखे पाटील यांच्या समवेत समिती ची चर्चा झाली*.या वेळी मंत्री विखेपाटील यानी मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्या सोबत च केंद्रीय ग्रह मंत्री याना ही निमंत्रित करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. त्यासाठी मंगळवारी स्मारक समिती ची मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक होणार असल्याची माहिती मंत्री विखेपाटील यानी दिली*.

error: Don\'t try to copy. Content is protected !!