Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

पांगरे येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव इतर ग्रामपंचायतीनी आदर्श घेण्याची गरज

करमाळा प्रतिनिधी
पांगरे येथे दि.16.11.2021 रोजी ग्रामसभा सरपंच, प्रा.डाॅ.सौ. विजया दत्तात्रय सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली घेणेत आली. सदरचे ग्रामसभेत विविध विभागाचे अधिकारी यांनी माहिती दिली. यामध्ये तलाठी श्री.गौरव कुलकर्णी यांनी पीकपाणी नोंदणी इ. बाबत माहीती सांगितली त्याच बरोबर कृषी विभागातर्फे कृषी सहायक सौ. निकत-सरडे मॅडम यांनी विविध योजनांची माहीती सांगितली तसेच शैक्षणिक विभागामार्फत जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी शैक्षणिक विकास व प्रगती बाबत माहीती सांगितली.
सदरचे ग्रामसभेत अस्तित्वात आसलेल्या मतदार यादीचे वाचन b.l.o.श्री कांबळे भाऊसाहेब व श्री शिंदे गुरूजी यांनी केले. त्यामध्ये मृताचे व स्थलांतरितांची नावे कमी करण्याचे व चुकीची नावे दुरूस्त करण्याची शिफारस करण्यात आली. या ग्रामसभेसाठी निरीक्षक म्हणून कृषी विभागाचे अधिकारी श्री हनुमंत नलवडे यांची शासनाकडून नियुक्ती होऊन त्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.सदरचे ग्रामसभेमध्ये महिला सभेने केलेल्या शिफारशीनुसार गावातील होत असलेल्या दारूविक्रीचे दुष्परिणाम व व्यसनाधीनता व त्याचे परिणामांवर सविस्तर चर्चा होऊन गावामध्ये होत असलेली दारूविक्री पुर्णत: बंद होण्याबाबत ठराव सहमत करण्यात आला. त्याच बरोबर इतर ही ठराव सहमत करण्यात आले. सदरचे ग्रामसभेत सचिव म्हणून ग्रामसेवक श्री समाधान कांबळे यांनी काम पाहिले. ग्रामसभेस उपसरपंच श्री गणेश वडणे, सदस्य सचिन पिसाळ, महेश टेकाळे, मयुरा पिसाळ मनिषा गायकवाड, राणी पाटिल, संध्या मुरूमकर यांचेसह जि.प. शिक्षक आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस बरोबरच गावातील बहुसंख्य महिलांसह नागरिक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group