Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाकृषी

केंद्र सरकारने  तीन कृषी कायदे रद्द केले यात संवेदनशील शेतकरी जिंकला शेतकरी एकजुटीचा विजय –  पुजा झोळे                                                                                                                 

 करमाळा प्रतिनिधी
केंद्र सरकारने आज तीन कृषी कायदे रद्द केले असून यात संवेदनशील शेतकरी जिंकला असून हा तर शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे राष्ट्रवादी युवती च्या प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे यांनी सांगितले आहे.गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आपल्या बायका पोरांसह रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आता यश आले असून मोदी सरकारने शेतीविषयक तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली.उशिरा भेटलेला न्याय हा न्याय नसतो,    तसेच उशिरा सुचलेल शहाणपण हे शहाणपण नसतं. संवेदनशील आणि शांततेने शेतकरी बांधव आपली मागणी मांडत असताना, निर्दयी मोदी सरकारने मात्र त्यांच्यावर धुरकांड्या, पाण्याचे फवारे मारले.सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.शेतकऱ्यांनी पिकवलेल मोदींच्या पोटात जात जात मात्र त्यांनी सांगितलेलं त्यांच्या डोक्यात काही जात नव्हतं, परंतु आता खूप उशिराने मोदी सरकारने हा निर्णय घेतला अर्थात त्या मागे स्वार्थ होता तो तोंडवर असणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या निवडणूका. शेतकऱ्यांन विषयी आत्मीयता ही फक्त दाखवायला आहे.त्यापाठीमागे दडला आहे तो त्यांचा अहंकार आणि हाच अहंकार आज शेतकऱ्यांनी मोडून काढला आहे, सबंध शेतकरी बांधवांचा आज विजय झालाय, त्यांच्यात असलेल्या एकीचा हा विजय आहे, खरंतर मी स्वतःला खूप नशीबवान समजते की या ऐतिहासीक लढ्याची साक्षीदार होण्याचं भाग्य मला  लाभलं असेही पूजा झोळे यांनी यावेळी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group