करमाळा तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवडी जाहिर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नलिनीताई जाधव
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माननीय रूपालीताई चाकणकर, आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ.सुप्रियाताई गुंड-पाटील यांनी करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या निवडी करमाळ्याचे आमदार माननीय संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे पार पडल्या. यावेळी करमाळा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सौ.नलिनीताई जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी नंदीनीताई लुंगारे,तालुका कार्याध्यक्ष पदी सौ.विजया कर्णवर, तालुका उपाध्यक्ष पदी सौ.अश्विनी मोहोळकर, सौ.शितल घाडगे, तालुका सरचिटणीस पदी पुष्पा कर्चे, तालुका सचिव पदी सौ.माया कदम, तालुका उपसचिव पदी सौ.मेघा डेरे, उपकार्याध्यक्ष पदी सौ.स्वाती गायकवाड, उपसचिव पदी सौ.पुष्पा ताई थोरात आणि तालुका कार्यकारणी सदस्य पदी सौ.पल्लवी साखरे, सौ शोभा दुरंदे, सौ संगीता फरांडे यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळेस करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे, शहराध्यक्ष शिवराज जगताप, तालुका अध्यक्ष संतोष वारे, तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रेय अडसूळ, राष्ट्रवादी युवक कांग्रेस सरचिटणीस गौरव झांजुर्णे, गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे,राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, कार्यकारिणी सदस्य महेश काळे, महाराष्ट्र प्रदेश पदवीधर सदस्य नितीन झिंजाडे, युवती तालुका अध्यक्षा शितलताई क्षिरसागर,वक्ता सेल तालुका अध्यक्ष शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे यांनी केले.यावेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे, तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, नूतन तालुकाध्यक्षा नलिनी ताई जाधव, जिल्हा उपाध्यक्ष लुंगारे ताई, शहराध्यक्षा राजश्री कांबळे,युवती तालुकाध्यक्षा शितलताई क्षिरसागर,युवती कार्याध्यक्षा स्नेहल अवचर आणि नूतन जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
