विक्रम उर्फ बाळासाहेब सूर्यवंशी सर यांना मातृशोक श्रीमती सुमित्रा सूर्यवंशी यांचे दुःखद निधन
करमाळा(प्रतिनिधी) – येथील कुंकू गल्लीतील रहिवासी श्रीमती सुमित्रा प्रतापराव सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या ८० वर्षांच्या होत्या.त्यांचे पश्चात एक मुलगा,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रम सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांचेवर आज संध्याकाळी आठ वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर प्राचार्य मिलिंद फंड सर प्राचार्य एल बी पाटील सर , प्राचार्य जयप्रकाश बिले उपप्राचार्य संभाजी किर्दाक सर युवा नेते दिग्विजय बागल, प्रशांत ढाळे, संजय अण्णा सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे संजय शीलवंत प्रवीण कटारिया, विवेकराव येवले,कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव विठ्ठलराव क्षिरसागर एडवोकेट कमलाकर वीर अल्ताफ तांबोळी नितीन घोलप प्राचार्य महेंद्र कदम सर, संजय शिंदे,नितीन आढाव , महेंद्र पेठकर, महेश भागवत सर नागेश माने सर, महेश परदेशी ॲड सुहास मोरे ,उमेश पवार, संग्राम परदेशी यशवंत परिवाराचे सर्व सदस्य शिक्षक प्राध्यापक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनमिळावू प्रेमळ हसतमुख स्वभावाच्या सूर्यवंशी काकू सर्वांना सर्वांना सहकार्य करणाऱ्या मोठ्या आई म्हणून सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
