कुगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दादासाहेब डोंगरे यांची बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी कुगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी दादासाहेब डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडी वेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय दादा डोंगरे आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे माजी संचालक ज्येष्ठ नेते आबासाहेब डोंगरे कुगाव सोसायटीचे चेअरमन महादेव कामटे माजी सरपंच महादेव मोरे माजी उपसरपंच मन्सूर सय्यद विजय कोकरे उद्धव गावडे अर्जुन अवघडे मंगेश बोंद्रे नवनाथ अवघडे माजी उपसरपंच इनुस सय्यद कैलास बोंद्रे देविदास झिंजुर्डे केरायण हवालदार आजिनाथ भोसले सागर पोरे राम डोंगरे देविदास झिंजुर्डे भगवान कांबळे जालिंदर हराळे लालासाहेब खर्चे आत्माराम डोंगरे राजू कांबळे स्वप्नील सुळ परबत कामटे राजुद्दीन राजुद्दीन मौला सय्यद चांद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते उपसरपंच निवडीनंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दादासाहेब डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत पेढे भरून आनंद उत्सव करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन उपसरपंच दादासाहेब डोंगरे यांनी मला हे पद आमचे नेते आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व गावातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर बागल गट आणि डोंगरे परिवार यांच्यामुळे मिळाले आहे उपसरपंच पद मिळाल्यामुळे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी चौफेर विकास करू असे उपसरपंच दादासाहेब डोंगरे यांनी सांगीतले आहे.
