घोषणांची अंमलबजावणी तात्काळ करा आणि मागिल सरकारच्या काळातील मंजुर योजनांची स्थगिती उठवा.. मुख्यमंत्र्याना मेलद्वारे ॲड अजित विघ्ने यांनी केली मागणी
केतुर प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पश्चिम भागातील युवक नेते ॲड. अजित विघ्ने यांनी मेल केलेला असुन सरकार स्थापन होताच केलेल्या सर्व घोषणांची अंमलबजावणी करने बाबत विनंती केली आहे.. रेग्युलर शेतकरी कर्जदारांना सरसकट ५०,०००/- देण्याची घोषणा केलेली असुन १ सष्टें पासुन पैसे खातेवर जमा होतील असे सांगितले परंतु प्रत्यक्षात कोणत्याही शेतकर्याला अद्याप पैसे मिळालेले नाहीत तसेच संजय गांधी निराधार मधील लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम मिळावी अशीही मागणी केली आहे.. आणि मागिल सरकार च्या काळातील मंजुर योजनांना जी स्थगिती दिलेली आहे ती उठवावी व सर्वसामान्य जनतेची विकासकामे मार्गी लागावीत अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.. त्यांचेशी अधिक बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री साहेबांना सण, समारंभ, आरत्या आणि मेळावे यातुन सध्या वेळ नाही, त्यातच शिवसेना कोणाची याचा वाद सतत चालु आहे, त्यामुळे यातुन वेळ काढुन जरा सर्वसामान्य जनतेची रखडलेली कामे तातडीने करावीत अशी अपेक्षा असुन.. तसे पत्र मेल द्वारे पाठविलेले असुन मुख्यमंत्री कार्यालयास ते पत्र मिळाले असल्याचा व याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करणार असलेचे देखिल कळविल्याचे सांगितले.
