Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळा

महिलांनी स्वाभिमानी बनण्यासाठी प्रशिक्षण घेऊन अर्थाजन करावे – नगराध्यक्षा सौ.मोहिनी सावंत

करमाळा प्रतिनिधी 
“महिलांनी पुढे येऊन स्वाभिमानाने अर्थाजन करून कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावावा”, असे आवाहन करमाळा नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांनी केले. त्या करमाळा नगरपालिकेच्या किल्ला विभागातील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्थेच्या ‘ मोफत शिवण क्लास फॅशन डिझायनिंग’ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे , यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, नगरसेवक संजय सावंत, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत , नगरसेविका चैताली सावंत, ग्राहक पंचायतीच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी , समता परिषदेच्या तालुकाध्यक्ष अनिता राऊत , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्थेच्या अध्यक्षा निशिगंधा शेंडे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना नगराध्यक्ष मोहिनी सावंत म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले प्रशिक्षण अभियान संस्थेचा मोफत प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाचे इतर संस्थांनीही अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्याचे स्वागत धनश्री सूर्यपुजारी यांनी स्वागत गीत गाऊन केले.
यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्थेने तळागाळातील महिलांसाठी सुरू केलेला उपक्रम हा प्रेरणादायी असून महिलांनीही या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी येऊन आपल्या पायावर स्वकर्तुत्वाने उभे राहून स्वाभिमानी बनावे” असे आवाहन करून या संस्थेला २५ हजार रुपयांचा निधी जाहीर केला . यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी यांनी ही संस्थेचे संचालिका निशिगंधा शेंडे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी शून्यातून या संस्थेला उभे करण्यासाठी केलेल्या त्यागाचा उहापोह केला. याप्रसंगी नगरसेवक संजय सावंत, समता परिषदेच्या तालुकाध्यक्षा अनिता राऊत तसेच प्रशिक्षणार्थी सोनाली पिसे, कवयत्री मंजिरी जोशी, शुभांगी खळदकर यासह प्रशिक्षणार्थी मुलींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वाती नाळे, मधुरा बनकर, मनीषा साने, मीरा शेंडे, वैशाली राऊत, स्वाती मोहोळकर, प्रमिला पाटील, शिंदे बाई, सरोजिनी खडके आदि महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिगंधा शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण लष्कर यांनी केले.सर्वांचे आभार संस्थेचे संस्थापक अनिल शेंडे यांनी मानले.
यावेळी निखिल शेंडे, गणेश शेंडे, आकाश शेंडे, शंकर शेंडे, सागर शेंडे, अनिल खडके आदिनी कार्यक्रम पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!