शिक्षक हाच समाजाचा अभियंता शिल्पकार असतो – भिष्माचार्य चांदणे सर
कावळवाडी प्रतिनिधी शिक्षक हाच समाजाचा अभियंता असतो, शिल्पकार असतो अशा प्रकारची भूमिका मांडून भविष्यात सैद्धांतिक शिक्षणापेक्षा व्यवहार उपयुक्त अथवा जीवन उपयुक्त शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरेल व तेच शिक्षण मानवी समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे ठरेल अशा प्रकारचे अत्यंत मौलिक विचार आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते व श्री कमलादेवी कन्या प्रशालेचे प्रा. सन्माननीय भीष्माचार्य लक्ष्मण चांदणे यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. एस यु राजे भोसले विद्यालयात ५ संप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ‘शिक्षक दिन ‘थाटात व दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व कावळवाडी गावचे प्रगतशील बागायतदार सन्माननीय रामचंद्रजी दगडू हाके- पाटील तर अध्यक्ष जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय महावीरजी गोरेसाहेब उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय बाळासाहेब काटे यांनी केले. विद्यार्थी हेच शिक्षकाचे दैवत असते व अशा दैवतासाठी व त्याच्या सर्वांगीण कल्याणसाठी शिक्षकांनी नेहमी कटीबद्ध असले पाहिजे कारण विद्यार्थ्यांप्रतीच्या समर्पणातूनच समाजामध्ये आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी निर्माण होतील अशा प्रकारचा आशावाद सन्माननीय महावीर गोरे साहेबांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर .एस .झांजुर्णे सरांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
