करमाळा

वाशिंबे गावावर तिसऱ्या डोळ्याची नजर ग्रामपंचायतीच्याकडून प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेराची सुसज्ज यंत्रणा-सरपंच तानाजी बापु झोळ

वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गावच्या विकास कामामध्ये अडथळा ठरनार्या गोष्टीवर चोवीस तास नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले असून त्याचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत कार्यालय येथे होत आहे.तसेच भविष्यात ही ईतर ठिकाणी कँमेरे बसविण्यात येणार आहेत अशी माहिती वाशिंबे ग्रामपंचायत सरपंच तानाजी झोळ यांनी दीली.

यापूर्वी वाशिंबे ग्रामपंचायती कडून नागरिकांना मोफत आरओचे शूद्ध पाणी देण्यात आले आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामाचे परिसरातील गावांमधून कौतूक होत आहे.पुढील काळात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र. गावातील अंतर्गत रस्ते,विविध वस्तीवर जाणारे रस्ते,भैरवनाथ मंदीर येथे सभागृह व डांबरी रस्ता,दलित वस्तीतील रस्ते,सौर ऊर्जा प्रकल्प आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून अशी विविध विकास कामे करण्यात येणार आहेत असे सरपंच तानाजी झोळ यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group