करमाळा

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवावर झालेल्या लाठीचार्जचा सकल मराठा समाजाकडुन निषेध ६ संप्टेबरला भव्य निषेध मोर्चा.

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटा तालुका अंबड जिल्हा जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर काल पोलिसांनी निर्दयीपणे लाठी चार्ज करून अत्याचार केला असुन यामध्ये अनेक महिला पुरुष आंदोलक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून करमाळा तालुका मराठा क्रांती सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी ठिक अकरा वाजता महात्मा गांधी पुतळा पोथरे नाका येथून मोर्चाला सुरुवात होणार असून करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सकल मराठा समितीच्यावतीने निवेदनात दिली आहे .याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक करमाळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे .यावेळी शेकडो मराठा समाज बांधवाबरोबर बहुजन उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!